आमचे संस्थापक
founder-img

श्री. बसवराज द्याडे

सह-संस्थापक, निती निकेतन बहुउद्देशीय ट्रस्ट

श्री. बसवराज द्याडे , यांनी गणित विषयात पदवी घेतली असून ते माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. १९९५ साली त्यांनी निती निकेतन बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. शिक्षण आणि समाजसेवा यांप्रती असलेल्या सेवाभावी वृत्ती आणि प्रेरणेतून एक शिक्षक म्हणून त्यांनी नेहमी आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रेरित केले आहे.

आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी असताना देखील या दांपत्याने अनेक गरजू व्यक्तींना आर्थिक आधार दिला आहे. तळागाळातील मुलांपर्यंत नैतिक शिक्षण पोहोचवण्याच्या संस्थेच्या कार्यात बसवराज जी यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व यांचा मोलाचा वाटा आहे.

founder-img

सौ. गोदावरी द्याडे

सह-संस्थापक, निती निकेतन बहुउद्देशीय ट्रस्ट

सौ. गोदावरी द्याडे , या निती निकेतन बहुउद्देशीय संस्थेच्या सह - संस्थापिका आहेत. त्यांनी नेहमीच शिक्षणाप्रती उत्कटतेने कार्य केले आहे. स्वतः इयत्ता ५ वी पर्यंतचे औपचारिक शिक्षण घेतलेले असताना देखील सतत शिकण्या आणि शिकवण्यासाठीची त्याची तळमळ उल्लेखनीय आहे. आपल्याला आलेल्या अडचणी आणि अनुभव यातून घेतलेले धडे यामुळे आपल्या आजूबाजूच्या समाजाला शिक्षणाच्या महत्वाबद्दल जागरूक करण्याची प्रेरणा त्यांना मिळत राहिली. संस्था उभारणीसाठी त्यांनी बसवराज जी यांच्या बरोबरीने अथक परिश्रम घेतले आहेत. समाजातील वंचित मुलांना आधार देत त्यांच्यापर्यंत दर्जेदार नैतिक शिक्षण पोहचवण्यात संस्थेला आलेल्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

founder-img

आमचे सहकारी

partner-logo
partner-logo
partner-logo

पुरस्कार

awards awards awards awards awards awards awards awards

आमच्याशी संपर्क साधा

पत्ता

निती निकेतन बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे माऊली बालक आश्रम (माऊली बालगृह), वाडेबोल्हाई, वाडेगाव रोड,
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे,
४१२२०७

स्थान

facebook insta linkedin